

पुष्पक नगर म्हणजेच सिडको नोड, हे नवी मुंबईचे नवीन सुवर्ण गुंतवणूक ठिकाण आहे!
जर नवी मुंबई रिअल इस्टेटचा इतिहास पहिला, तर प्रामुख्यने एक अद्भूत आणि विलक्षणीय बदल दिसून येइल…. आणि तो म्हणजे नव्याने निर्माण झालेले उलवे नोड.
जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) यांना जोडतो. मोठ्या आणि प्रगतीशील प्रकल्पांमुळे, उलवे हा परिसर नवी मुंबईत खूप वेगाने विकसित झाला, लोकांमध्ये लोकप्रिय झाला, पायाभूत सुविधा, रस्ते, कनेक्टिविटी, घरांचे प्रोजेक्ट्स, स्कूल्स, यामुळे त्याचे यशस्वी उदाहरण म्हणून नाव घेतले जाते. उलवे नोड हे नवी मुंबई शहरातील सर्वात मोठे यशोगाथांपैकी एक बनले. आणि याच उच्चत्वामुले उलवे नोड च्या जागेंची वा घरांची किमत वाढत चालली असुनही ग्राहकांच्या घर घेण्याच्या पनसंतीचे मुख्य विभाग बनले आहे. आणि उलवे बरोबरच जोडले गेलेल्या पुष्पकनगर येथे देखील.
______________
१. उलवे नंतरचे नवीन हॉटस्पॉट, घर घेण्याचे मनसंतीचे ठिकाण म्हणजे पुष्पकनगर!!
नवनिर्माण झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी शेजारी वसलेले पुष्पकनगर हे नवी मुंबई मधील सर्वात मोक्याच्या ठिकणी आहे it's a hotspot of Navi Mumbai.
पुष्पकनगर हे NH4B आणि अटल सेतू (MTHL) द्वारे थेट जोडलेले आहे, ज्यामुळे ते नवी मुंबई आणि South मुंबई दोघांशी कनेक्टिव्हिटी देते.
पुष्पक नगर उगवता तारा आहे. आज
उलवे येथील मालमत्तेचे दर आता ₹८,४०० ते ₹८,७०० प्रति चौरस फूट दरम्यान आहेत, तर पुष्पक नगरमधील मालमत्तेचे दर अजूनही ₹६,२०० ते ₹६,५०० च्या आसपास आहे म्हणजेच उल्वेच्या तुलनेत २५% कमी आहे. पण ही किंमत जास्त काळ राहणार नाही. कारण विमानतळ पूर्णत्वाकडे येत असताना आणि अटल महामार्गची कनेक्टिव्हिटी जोडताना येथील मालमत्तेच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. आणि लवकरच उलवे ला मागे टाकेल, आणि म्हणूनच पुष्पकनगर मध्ये गुंतवणूक ही सुवर्ण गुंतवणूक ठरते.
लवकरच रिअल इस्टेट जगात पुष्पकनगरला परिपूर्ण विकसित, आधुनिक, सर्वाधिक घर, मालमत्ता क्षेत्र, म्हणून प्रथम प्राधान्य मिळेल.
२. पुष्पक नगर पुढे येण्याची तीन ठळक महत्वाची कारणे म्हणजे कनेक्टिव्हिटी,नियोजनबद्ध, आणि बजेट फ्रेंडली.
I) कनेक्टिव्हिटी.
पुष्पक नगरमध्ये जोडले गेलेल्या कनेक्टिव्हिटी मुळे ग्राहकांच्या पहिल्य पसंतिचे ठिकण बनले आहे. नवीन विमानतळापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आणि अटल सेतूद्वारे थेट दक्षिण मुंबईशी जोडलेले आहे या कनेक्टिव्हिटी (अटल सेतूमुळे) नवी मुंबई ते मुंबई मध्ये पोहोचण्यासाठी पुर्वी २ ता सांचा प्रवास आता केवळ २५-३० मिनिटांत करणे शक्य झाले. म्हणूनच नवी मुंबई ते मुंबई प्रवास कमी वेळेत, सुखकर करणे शक्य झाले आहे.
II)नियोजनबद्ध
सिडकोचा शेवटचा आणि सर्वात आधुनिक नोड म्हणून, पुष्पक नगरची रचना आजच्या आणि भविष्याच्या गरजा लक्षात घेऊन केलेली आहे, जसे की रुंद रस्ते, चांगली ड्रेनेज सिस्टम, खुले ग्रीन झोन आणि सुव्यवस्थित लेआउट.
सिडको २.० मॉडेल आहे. इतर प्रत्येक नोडच्या उत्क्रांतीपासून त्यांचा सखोल अभ्यास करून, चुकांची पुनरावृत्ति टाळून आधुनिकतेकडे वाटचाल करणारा पुष्पकनगर बनला आहे.
III) परवडणारी घरे/ बजे ट फ्रेंडली
आधुनिक पुष्पकनगर च्या मालमत्तेच्या/ घरांच्या किमती अजूनही सर्वसामान्यांना परवडणारी आहेत. आणि कीमती झपाट्याने वाढत देखील आहेत. लवकरच भविष्यात सर्वात जास्त किमतीचे शहर म्हणून पुष्पकनगर ओळखले जाणार.
त्यामुळे ग्राहक/ इन्वेस्टरस पुष्पकनगर ला प्राध्यान्य देत आहेत. Low investment and High Return is equal to Pushpaknagar.
______________
३. विमानतळाभोवती बांधलेले - भविष्यातील एरोसिटी
लवकरच पुष्पकनगर आधुनिक, प्रीमियम बिझनेस-कमर्शियल शहर म्हणून नावलौकिक मिळवनार
हे केवळ विमानतळाजवळ वसलेले शहर नाही, तर भव िष्यात विमानतळामुळे उद्योग, रोजगार, कॉर्पोरेट क्षेत्र, या ठिकाणी निर्माण होवू लागेल.
लवकरच विमान वाहतुक सुरू झाली कि आपोआप लॉजिस्टिक्स हॉटेल्स, रिटेल आणि कॉर्पोरेट offices येतील. यामुळे रोजगाराच्या नव संधी उपलब्ध होतील. या कारणांमुळे काम करणाऱ्या व्यावसायिकांना जवळपास घरे हवी असतील, ज्यामुळे स्थिर भाडे उत्पन्न आणि वाढती मागणी सुनिश्चित होईल.
सिडकोच्या मास्टर प्लॅनमध्ये आधीच ५-स्टार हॉटेल्स, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शाळा आणि डी-मार्ट, मॉलस, कमर्षिअल ऑफिसेस सारख्या रिटेल हबसाठी भूखंड समाविष्ट आहेत. याचा अर्थ आरोग्यसेवेपासून शिक्षणापर्यंत सर्व काही व्यवसायापासुन करमणूकीपर्यंत सर्वकाही टाउनशिपमध्ये नियोजित केले आहे.
त्याशिवाय, प्रस्तावित २५० एकर एज्युसिटी (Edu City) जवळच येत आहे, ज्यामध्ये एबरडीन आणि यॉर्क सारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचा समावेश आहे . पुष्पकनगर एक परीपूर्ण विकसित, आधुनिक क्षेत्र तयार होत आहे.
______________
४. गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ का आहे?
उलवे येथील रिअल इस्टेटमधील यशकथेनं दाखवून दिलं की मोठ्या पायाभूत सुविधांच्या प्लानिंग च्या वेळेला केलेली सुरुवातीची गुंतवणूक किती मोठं फळ देऊ शकते.
आता पुष्पक नगर ही त्याच संधीची पुनरावृत्ती आहे—परंतु यावेळी आणखी उत्तम नियोजनासह आणि थेट विमानतळाच्या जवळ.” म्हणजेच उलवे पेक्षा दोन पाऊल पुढे।
सध्या, उलवे आणि पुष्पक नगरमधील प्रति चौरस फूट सुमारे ₹२,००० च्या किमतीतील फरक गुंतवणूकदारांना स्पष्ट फायदा देतो. विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर (डिसेंबर २०२५ पर्यंत अपेक्षित) आणि शहरातील व्यावसायिक जिल्हे अटल सेतूद्वारे अखंडपणे जोडले गेल्यानंतर, येथील किमती वेगाने वाढनार आहे.
“ही फक्त दुसरी रिअल इस्टेटची कहाणी नाही. तर ही पुढच्या मोठया वेगवान प्रगतशील वाटचालीची लाट आहे.”
पुष्पकनगर नवी मुंबईचे मुख्य ठिकाण बनल्यावर आता जे लोक यात गुंतवणुकीसाठी पाऊल ठेवतील त्यांना सर्वाधिक फायदा होईल.
आजचा पुष्पकनगर म्हणजे भविष्यातला बिटकॉइन—जो आज कमी किमतीत मिळतो, पण उद्या अमूल्य ठरतो.”


